विशेष बातमी
अंधश्रद्धा निर्मुलन ही काळाची गरज-अशोक वानखडे
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘अंधश्रद्धा निर्मुलन’ या विषयावर दि. 22 जुलै रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अनिसचे) कार्यकर्ते अशोक वानखडे व राजेंद्र कोळी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यानिमित्त गजानन ढगे, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते भाऊ भोजने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ. संजय टाले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. प्रस्तावना महाविद्यालय विकास समिती सदस्य गजानन ढगे यांनी केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व त्याचे महत्त्व सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले अशोक वानखडे व राजेंद्र कोळी यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन विषयक मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा निर्मूलनही काळाची गरज आहे याची महत्त्व याद्वारे त्यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. निशिगंध सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. गजानन पैकट यांनी केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर याच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.