कृषी
अंबिया बहार संत्रा फळपीक विमा व गारपीटचा प्रलंबीत निधी संदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे पालकमंत्री याना निवेदन
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बावनबीर , सोनाळा परिसरात संत्रा पिक मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते फेब्रुवारी महिण्यात वादळी वाऱ्या सह गारपीट झाल्याने संत्रा पिक सह रब्बी पिक कांदा गहू ज्वारी हरबरा भुईमुंग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अंबिया बहार संत्रा फळ पीक विमा अंतर्गत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी पिक विमा काढूलेला आहे गारपीटचे सर्वे झाले मात्र संबंधीत शेतकरी गारपीट अनुदान व पिक विम्या पासुन वंचीत असुन संत्रा उत्पाद शेतकऱ्यांना पिक विमा व रब्बी पिक उत्पादक शेतकऱ्यांना गारपीटमुळे झालेली नुकसान भरपाई लवकर द्या अशी मांगणी बावनबीर सोनाळा येथील शेतकऱ्यांनी ना पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एका निवेदन व्दारे केली आहे शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन,उसनवारी करून,कृषी केंद्र संचालक कडून उधार घेऊन शेतात पेरणी केली होती पिकाच्या भरवश्यावर कर्ज आणि कृषी केंद्र फेड करू मात्र फेब्रुवारी महिन्यात अचानक वादळी वारा, पाऊस,गारपीट झाली शेतकऱ्याच्या तोंडात आलेले घास निसर्गाने हिरावून घेतले.झालेल्या नुकसान ची राज्य सरकार ने दखल घेतली प्रशासन ला पंचनामे करण्याचे आदेश दिले,पंचानामे ही झाले राज्य सरकारने मदत ही घोषित केली मात्र ती मदत अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली नाही.सोबतच सोनाळा, बावणबिर या परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात आहे.या परिसरातील शेतकऱ्यांनी अंबिया बहार चा फळ पीक विमा काढला होता त्या विमा चा लाभ अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण या विषयावर जास्तीने लक्ष घालून,वरील शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावाल व मदत मिळून द्याल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार प्रतापराव जाधव हे जिल्हा नियोजन समिती च्या बैठक साठी बुलढाणा दौऱ्यावर असताना व्यक्त केली निवेदन देता वेळी भाजपा चे जिल्हा सचिव श्याम अकोटकार,सचिन अग्रवाल, योगेश पुंडे,हर्षल तायडे, प्रदीप पुंडे,भूषण मालोकार व शेतकरी उपस्थित होते