क्राईम
अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन संतप्त पालकांचा.. विकृत मास्तर डीगोळेला निलंबित करा, अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील टुनकी जिल्हा परिषदेच्या शाळेत विकृत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना घडल्याने. संतप्त पालकांनी तसेच ग्रामस्थांनी विकृत मास्तराविरोधात आज १३ फेब्रुवारीला गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली सदर
घटना १० फेब्रुवारीला घडली होती. डी.जे डीगोळे असे विकृत मास्तराचे नाव असून तो सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरोधात ग्रामस्थ तसेच शाळा समितीने तक्रार दिली. विकृत डीगोळेला सेवेतून निलंबित करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली,अन्यथा शाळेला कुलूप ठोकू असा निर्धार संतप्त पालकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी साबळे, सरपंच वंदना गायकवाड ,उपाध्यक्ष लक्ष्मी पारस्कार, शिवाजी दहिकर, शिवाजी बावस्कर, रितेश वरणकर, हरदीप कौर भाटीया, विशाल लोणकर, देविदास बावस्कर,अश्विन उंडे, गोपाल उमाळे, उर्मिला धरमकर, मंदाबाई मुरलीधर चोरे , रामा कोष्ठी , पालक जीवन राजाराम लोणकर, विजय लोणकर ,जीवन लोणकर सह शेकडो ग्रामस्थांनी दिला या घटनेने पंचक्रोशीत संताप व्यक्त होत आहे