महाराष्ट्रविशेष बातमी
अवैध रेतीचा ३५० ब्रास साठा जप्त कर्तव्यदक्ष तहसिदार योगेश्वर टोम्पे यांची धडक कारवाई
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील खिरोडा गावात पुर्णा नदि पात्रातुन अवैध उत्खलन करून ४ ठिकाणी एकुण साडेतिनशे अवैध रेती साठ्यावर कर्तव्यदक्ष तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी महसुल पथकासह पोलीस बंदोबस्तात छापा टाकुन खिरोडा येथील ३५० ब्रास अवैध रेती साठा जप्त केला तालुक्यात नदि नाल्या पात्रातुन अवैध रेती उत्खलन करुन अवैध रेती साठवण केल्या जात आहे हि बाब कर्तव्यदक्ष तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांना समजताच तहसिलदार टोम्पे यांनी मंडळ अधिकारी राऊत व संबंधीत तलाठी सह तामगाव पोलीस बंदोबस्तात आज दुपारी अंदाजे दिड वाजताच्या सुमारास तालुक्यातील खिरोडा गावात अवैध रेती साठ्यावर छापा मारुन खिरोडा येथील चार ठिकाणचे अवैध रेतीचे अंदाजे 350 ब्रास चे साठे जप्तीची कारवाई केली व विना विलंब सर्व शासकीय कंत्राटदारांना याबाबत माहिती दिली व वाळू साठे घेण्याबाबत इच्छुकांकरिता जाहिरनामाही काढण्यात आला. तेंव्हा संग्रामपूर येथे दिवाणी न्यायालयाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना लिलाव पद्धतीने ७०० रुपये ब्रास प्रमाणे सदर रेतीसाठे आजच त्यांना सुपूर्द करण्यात आले असून. 3 दिवसात पूर्ण रेतीसाठा लिलावात घेणाऱ्या संबंधीत शासकिय ठेकेदार यांनी उचलून घेण्यास तहसिलदार टोम्पे यांनी सांगितले आहे लिलाव पद्धतीने संबंधीत ठेकेदार याना 350 ब्रास चे चलनही उपलब्ध करून दिले असल्याची माहिती महसुल विभागाच्या वतीने देण्यात आली तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी अवैध रेती साठ्यावर छापा मारुन जप्तीची धडक कारवाई करुन व तात्काळ ३५० ब्रास अवैध रेती जप्ती साठ्याचा लिलाव केल्याने तहसिलदार व महसुल विभागाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे