अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण दिपक इंगळे यांचा ईशारा
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील आवार गावातुन भरदाव वेगाने अवैध रेती वाहतुक सुरु असुन रात्री भरदाव वेगाने अवैध रेती वाहनाने पाळीव कुत्र्याच्या अंगावरुन नेल्याने कुत्रा जागीच ठार झाला अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मांगणी एका निवेदन द्वारे आवार येथील सामाजीक कार्यकर्ते दिपक इंगळे यांनी तहसिलदार यांच्या कडे केली आहे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि वान पुर्णा नदि पात्रातुन अवैध रेती उपसा करुन आवार गावातुन अकोला जिल्ह्यात तेल्हारा परिसरात अवैध रेती वाहतुक सुरु असुन सदर टिप्पर गावातुन रेतीचे वाहने भरदाव वेगाने वाहन चालक नेतात दि १५ जानेवारी रोजी रात्री दिड वाजताच्या सुमारास अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिप्पर चालकाने पाळीव प्राणी कुत्र्याला चिरडल्याने त्यात कुत्र्याचा जागीच मुत्यु झाला दिवस रात्र आवार मार्गे तेल्हारा परिसरात भरदाव वेगाने अवैध रेती वाहतुक केली जात आहे या बाबत महसुल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र अवैध रेती वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली नाही पादचारी नागरिक शाळकरी मुलांचा भरदाव वेगाने अवैध रेती वाहन चालकां पासुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा आवार गावातुन होणारी अवैध रेती वाहतुक बंद करुन कारवाई करण्यात यावी अन्यथा दि ३० जानेवारी पासुन तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा ईशारा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातुन सामाजीक कार्यकर्ते दिपक यांनी दिला आहे अवैध रेती वाहतुक करणाऱ्या वाहनावर महसुल विभाग कारवाई करते काय याकडे आवार ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे