आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाणे हाच यशाचा मुलमंत्र आहे प्रा.राजेश पाटिल ताले जळगाव जा तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील शाळेत विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम

जळगाव जा [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पीएम श्री जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळा येथे पीएम श्री अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय व्याख्याते प्रा. राजेश पाटिल ताले उपस्थित होते.शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विविध छंद जोपासावेत,शाळेतील शिक्षण आपल्याला परीक्षेत यशस्वी करेल पण जोपासलेलेलं छंद आपल्याला जीवनाच्या शाळेत यशस्वी करतील.याकरिता आईवडिलांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यांना वाव द्यावी तसेच त्या सुप्त गुणांचे संवर्धन करावे असे मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यां सह शिक्षकांना प्रा. राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.पीएम श्री जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हेंडवे शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा इ.परिक्षेमध्ये दरवर्षी ही शाळा बुलडानाच नाही तर विदर्भात अव्वल असते.पीएम श्री अंतर्गत येणाऱ्या काळात राज्यभर बुलडाणा जिल्ह्याच नावलौकिक करेल असे प्रतिपादन महेंद्र हेंडवे यांनी केले.