आदिवासी कोळी महादेव जमातीचे हायवे वर रास्ता रोको आंदोलन

मलकापुर :- जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभ रित्या निर्गमित करण्यात यावे यासाठी दि. २ जानेवारी रोज मंगळवार पासून आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बांधवांनी एल्गार अन्नत्याग आमरण उपोषणास सुरुवात केली असून आज १० दिवस उलटूनही उपोषणकर्त्यांची शासन व प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्याने आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने हायवे क्रमांक सहावर तांदुळवाडी यथील पुलावर आज एक वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेसविस्तर वृत्त असे की आदिवासी कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र शासन – प्रशासन स्तरावरून सुलभरित्या निर्गमित होत नसल्याने दि. २ जानेवारी रोज मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने प्रमाणपत्रासाठी एल्गार अन्नत्याग आमरण उपोषण चालू करण्यात आले असून अमरावती विभाग बेरार प्रांत मधील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरीत्या देण्यात यावे, महाराष्ट्रातील इतर अनुसूचित जमातीला जात प्रमाणपत्र सुलभ रीत्या देण्यात येते त्याचप्रमाणे कोळी महादेव जमातीस सुद्धा जात प्रमाणपत्र सुलभरीत्या देण्यात यावे तसेच पाल पारधी ,राज पारधी, गाव पारधी ,हरण शिकार पारधी हे विभक्त जाती अ व्हि जे ए मध्येे येत असून त्यांनी नाम सदृष्या चा फायदा घेऊन अनुसूचित जमातीचे बोकस प्रमाणपत्र मिळवले आहे तरी ते प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात यावे अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यासाठी गणेश इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ हे बेमुदत
आमरण उपोषणास बसले आहे ,परंतु आदिवासी कोळी महादेव जमातीच्या मागण्याकडे शासन -प्रशासन स्तरावरून जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याने आदिवासी कोळी महादेव जमात संतप्त होऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई -नागपूर हायवे नंबर सहावर तांदुळवाडी येथील पुलाजवळ आज दि.11जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे अनेक तास वाहनाची वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळें वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच शासन प्रशासनाच्या विरोधात “आरक्षण आमच्या हक्काचे – नाही कोणाच्या बापाचे, असा कसा देत नाही – घेतल्याशिवाय राहत नाही ” अशा प्रकारच्या घोषणाबाजी केल्या असुन यापुढे शासन – प्रशासनाने लक्ष न दिल्यास यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा देऊन निवेदन देण्यात आले तसेच या आंदोलनातील कोळी महादेव जमातीचे कार्यकर्ते पुरुषोत्तम झाल्टे, ज्ञानेश्वर खवले, विश्वनाथ पुरकर ,वासुदेव सोनवणे, तुकाराम झाल्टे ,श्रीकृष्ण तायडे ,गंगाधर तायडे, लखन सपकाळ, मधुकर धाडे ,सौ गीता कठोरकार, सागर सोनवणे, गणेश सुरळकर,, शांताराम धाडे,, बाळू पाटील, भागवत घाईट,विलास कांडेलकर, विकास धाडे ,राजू शिरसाट, अमित धाडे ,संदीप लष्करे, इत्यादी कार्यकर्त्यांना दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांनी १८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध करण्यात आले त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले यावेळी मलकापूर तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीचे हजारो लोकसंख्येने उपस्थित असल्याने यामुळे पोलीस प्रशासनाची एकच तारांवर उडाली असली तरी कोळी महादेव जमातीने शांततेत रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.