क्रीडाविशेष बातमी
आलियार खान याची अमरावती विद्यापीठ कबड्डी संघात कलर कोट साठी निवड
संग्रामपुर [प्रतिनिधी ] संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या मुलांच्या कबड्डी संघात कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथील आलियार खान अनवर खान या खेळाडूची अमरावती विद्यापीठ कबड्डी संघात कलर कोट म्हणून निवड झाली आहे. कला वाणिज्य महाविद्यालयाचा कबड्डी मुलांचा संघ झोन विजेता ठरला आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धा दिनांक19 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत जे जे यु विद्यापीठ झुंझुनू राजस्थान येथे संपन्न होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये कला व वाणिज्य महाविद्यालयचा आलियार खान प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीचे श्रेय तो सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. स्वातीताई वाकेकर डॉ. संदीप वाकेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरनकर महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉ. गजानन पैकट प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना देत आहे. त्याच्या निवडीची वार्ता पातुर्डा गावात समजात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आलीयार खान याचे सर्वत्र कौतुक होत आहे.