विशेष बातमी

आलेवाडी येथे जागतीक आदिवासी दिवस उत्सहात साजरा

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील आदिवासी बहुल गाव आलेवाडीत जागतीक आदिवासी दिन उत्सहात साजरा करण्यात आला येथील खाजा नाईक आदिवासी चौक जागतिक आदिवासी दिना निमित्त छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आलेवाडीचे पोलिस पाटील मुजाहिद सुरत्ने, अशपाक सुरत्ने ग्रां. प. सदस्य इलियास सुरत्ने अक्तर सुरत्ने हारिश सुरत्ने व उपस्थित शिक्षक वृंदाच्या वतीने पुष्प हार अर्पण करण्यात आले याप्रसंगी आदिवासीचे प्रेरणास्थान बिरसा मुंडा यांच्या जिवन चरिवावर हारिश सुरत्ने , अशपाक सुरत्ने , सह शिक्षक अब्दुल नबा , सलमान , पोलीस पाटील मुजाहिद सुरत्ने , यांनी यांनी प्रकाश टाकला जागतीक आदिवासी दिना निमित्त उपस्थित मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.आलेवाडी चौक मध्ये आदिवासी संघटनाच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी कासम पाले, मिस्टर पाले , आबीद सुरत्ने , ईकबाल सुरत्ने , शाहिद सुरत्ने, बशीर जांभुळकर , अशपाक सुरत्ने , रफिक सुरत्ने, सोहेल सुरत्ने, शाहिद उकर्डे , अबुजर अकबर , ईरफान गफफार , संदिप केदार , अन्ना पाले ,रुबाब बारे अलीम पाले , अमीत पाले , मुस्ववीर केदार मुंतजीर डोंगरे , अब्रारार केदार , राजीक मंडपवाले बशीर जांबुळकर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी शिक्षक सलमान ,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak