क्रीडामहाराष्ट्रविशेष बातमी

आवार येथील कृष्णा अहिर बुध्दिबळ स्पर्धे साठी राज्यस्तरावर निवड संग्रामपुर तालुक्या सह बुलढाणा जिल्ह्याचे नाव लौकिक

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील आवार गावाची लोकसंख्या १ हजार या गावात मराठी माध्यमाची १ ते ७ पर्यत शाळा त्यामुळे शेतकरी प्रशांत अहिर यांनी मुलांच्या शिक्षणासाठी भाड्याने जागा घेऊन तेल्हारा येथे स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ इंग्रजी माध्य असलेले शाळेत आपल्या मुलाला कृष्णा प्रशांत अहिर याचा प्रवेश घेतला बुध्दिबळ खेळातुन विद्यार्थीची एकाग्रहता वाढते व बौध्दिक विकास होते विद्यार्थ्याच्या कुशाग्रहतेला चालना मिळावी म्हणुन कृष्णा अहिर हा लहान पणा पासुन चाणक्य असल्याने व त्याच्या कला गुणांना वाव मिळावी म्हणुन  प्रशिक्षक शिक्षक विशाल बावने यांच्या तालीमात मार्गदर्शनात तयार झालेला  अकोला महानगर जिल्हा चेस असोशिएशन व प्रभात किड स्कुल यांच्या संयुक्त विदमाने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन अकोला येथे २१ जुलै रोजी करण्यात आले होते या राष्टीय बुध्दिबळ स्पर्धेत १५ वर्ष वय गटातील विद्यार्थी कृष्णा प्रशांत अहिर यांने द्वितीय क्रमांक पटकावला तर कृष्णा अहिर याची राज्यस्तरावर निवड झाली आयोजक प्रभात किड स्कुल डॉ गजानन नारे, संत तुकाराम हास्पीटल डॉ गिरीश अग्रवाल, जिल्हा बुध्दीबळ असोशिएशनचे अध्यक्ष संदिप पुंडकर , सचिव जितेन्द्र अग्रवाल , बुध्दिबळ प्रशिक्षक अग्रवाल आदि मान्यरांच्या उपस्थितीत शिल्ड व पारोतोषीक देऊन कृष्णा अहिर या विद्यार्थीचा सन्मान करुन कौतुक केले लहान खेडे गावातुन कृष्णाची राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत निवड झाल्या बद्दल शेतकरी पुत्र कृष्णा अहिर याचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे कृष्णा आपल्या यशाचे श्रेय आई वडिल प्रशांत अहिर व  प्रशिक्षक शिक्षक विशाल बावने यांना देतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak