आ डॉ संजय कुटे यांचे चित्र स्वताच्या रक्ताने रेखाटले पातुर्डा येथील एकनिष्ठ युवा कार्यकर्ता शुभमच्या आगळा वेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] नेत्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुक दरम्यान वेगवेगळे नवस करतात सध्या निवडणुका नसतांना आगळा प्रेम आदर आपल्या नेत्यासाठी आ डॉ संजय कुटे यांचे स्वताच्या रक्ताने रेखाटले चित्राची अर्थात पातुर्डा येथील निष्ठावंत कार्यकर्ता शुभम म्हसाळ याची चर्चा सोशल मिडीया होत आहे जळगाव जा विधान सभा मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे यांचे पातुर्डा येथील एकनिष्ठ विश्र्वासु युवा कार्यकर्ते शुभम अरुणराव म्हसाळ यांनी स्वताच्या रक्ताने बुलढाणा येथील सुप्रसिध्द कलाकार टिल्लु गोरले यांनी रक्ताने चित्र रेखाटले व आ कुटे व स्वताचा एकत्रीत फोटो फ्रेम आमदार डॉ संजय कुटे यांना भेट दिले या प्रसंगी आ कुटे यांनी एकनिष्ठ विश्वासु युवा कार्यकर्ता शुभम म्हसाळचे आपल्या प्रती असलेले प्रेम पाहुन भारावले व आपल्या कार्यकर्ते शुभम याला गळाभेट घेत कौतुक केले यावेळी आ डॉ कुटे यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत, देऊळगाव येथील सीआयएसएफ जवान मेजर संदिप वखारे , राजेश जमाव, पंकज कड उपस्थित होते