घटना

उकळी बु येथे कर्ज बाजारी अल्पभुधारक शेतकऱ्यांची आत्महत्या गळफास घेऊन आत्महत्या

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील उकळी बु येथील ५२ वर्षीय कर्ज बाजारी अल्पभुधारक शेतकऱ्यांने गाव लगत असलेल्या स्वताच्या शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि १५ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली मृतक शेतकऱ्याचे नाव श्रीकृष्ण रामभाऊ बनकर आहे
या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील उकळी बु येथील शेतकरी श्रीराम बनकर यांच्याकडे गावलगत ३ एकर शेत असुन सदर शेतीवर एक लाख पंच्यांशी हजार रुपये कर्ज व नातेवाईक ओळखीच्या व्यक्ती कडून घेतलेले उसनवार बॅके कर्ज कर्जाचे वाढते डोंगर निर्सगाची अकृपा नापीकी शेती उत्पन्न एक स्त्रोत असल्याने शेती पिकत नसल्याने कर्जाची परत फेड कशी करावी या विवचनेत कर्जापाई नैराश्य पोटी श्रीकृष्ण बनकर या अल्पभुधारक शेतकऱ्याने गाव लगत असलेल्या स्वताच्या शेतात झाडाला दि १५ मार्च रोजी दुपारी दिड वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली सदर घटनेची माहिती तामगाव पोलीसांना समजताच तामगाव पोलीस घटना स्थळी दाखल होऊन निंबाच्या झाडा वरुन प्रेत काढून पंचनामा केला व श्वविच्छेदन झाल्या नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले तामगाव पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार कुसुंबे करित आहे  मृतकाच्या पश्चात पत्नी ,तीन मुले आहेत अल्पभुधारक बनकर कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शासन प्रशासनाने मृतक शेतकरीच्या बनकर कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी उकळी बु ग्रामस्था कडून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak