उद्या डिपीआय पक्षाची राज्य कार्यकारणी बैठक विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे : भाई छोटू कांबळे
बुलढाणा :- डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाची राज्य कार्यकारणी बैठक उद्या दि. 14 जानेवारी 2024 रोजी, दुपारी 1 वाजता, छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल सिल्वर इन , सेव्हन उडानपूल जवळ येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या राज्य कार्यकारणी बैठकीला विदर्भातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांनी केले आहे. आगामी लोकसभा , विधानसभा व आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा .सुकुमारजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजिंक्यभैय्या चांदणे, महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष सोहनजी लोंढे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारी बैठक पार पडणार आहे. या बैठकीमुळे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असून महाराष्ट्रमध्ये मोठे संघटनचे जाळे जोरात विणल्या जाणार असल्याचे विदर्भाध्यक्ष भाई छोटू कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलतांना सांगितले. तसेच बैठकीला विदर्भातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे विदर्भ युवक प्रदेश अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांनी केले आहे.