कमी गुण घेणारे विद्यार्थी उद्या देशाच भविष्य हे विसरता कामा नये तहसिलदार योगेश्वर टोम्पे पातुर्डा येथील 10 वी 12 च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] पालकांनी आपल्या पाल्यावर कोणतेही दबाव न टाकता त्यांना ज्या क्षेत्रात जमेल ते शिक्षण घेऊ द्या मोबाईल ने खूप मोठा घात केला आहे.मोबाईल चांगला जेवढा तेवढा वाईट ही आहे ते स्वतावर निर्भर आहे की आपण त्या मधून काय चांगला घेतो .कमी मार्क्स पडले म्हणून मानसिक तनाव मध्ये जाऊ नका,दुसऱ्या मार्गावर वळू नका,अनुचित प्रकार करू नका,आज चा कमी मार्क घेणारा विद्यार्थी कदाचित उद्याच या देशाच भविष्या असेल हे विसरू नका.असे प्रतिपादन संग्रामपूर तहसिल चे तहसीलदार योगेश टोम्पे यांनी अपेक्स कोचिंग व सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सयुक्त विदेमाने पातुर्डा जि प कनिष्ठ महाविद्याल सभागृहात उर्दु मराठी विद्यालय १० वी १२ च्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ कार्यक्रमात केले
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर च्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पातुर्डा गावाचे प्रथम नागरिक सरपंच रणजित गगतिरे, तर व्यासपीठावर तहसीलदार योगेश्वर टोम्पे, तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, सेवानिवृत गटविकास अधिकारी रमेश भामद्रे, शिक्षक गजानन ढोके, अंबादास मेसरे,देविदास कूसुबे, विजय सातोटे , मुख्यध्यापक मावस्कर विनायक चोपडे,सागर कापसे,अंकुश कुरवाळे, श्रीकृष्ण आमझरे यांची उपस्थिती होती.
पातुर्डा बु येथील जि प शाळा,दादासाहेब बाहेकर उर्दू हायस्कुल , प्रकाशराव भास्करराव भोंगळ कॉलेज श्रीराम वानखडे विद्यालय पातुर्डा फाटा, बॅरिष्टर देशमुख विद्यालय कवठळ येथील विद्यार्थी या वेळेस उपस्थित होते.या वेळी विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.विद्यार्थी याना शिल्ड, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.या वेळी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रमेश भामद्रे यांच्या सह विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम चे संचालन कोल्हे यांनी केले तर शिक्षिका उजवला ढबाळे यांनी आभार मानले