विशेष बातमी

कवठळ येथील जि प उर्दू शाळे शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरा अन्यथा ताला ठोको आंदोलन शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती ग्रामस्थांचा शिक्षण विभागाला ईशारा

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील कवठळ येथिल जि प उर्दु शाळेत ९ पदे मंजुर असुन ९ पैकी ४ पदे रिक्त असल्याने या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे भवितव्य अंधारमय झाल्याने शिक्षण विभागाने लक्ष द्यावे त्वरित शिक्षकांची रिक्त पदे भरून विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान थांबवावे अन्यथा लोकशाही मार्गाने विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी जि प उर्दु शाळेला कुलुप ठोको आंदोलन छेडण्याचा ईशारा शाळा व्यवस्थापन समीतीच्या वतीने गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे
गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि कवठळ येथील जि प उर्दु शाळेत उच्चश्रेणी १ पद ,भाषा १ पद , गणीत १ पद , सा शा १ पद तसेच सहाय्यक अध्यापक ५ असे एकुण ९ पदे मंजुर असुन वर्ग १ ते ८ पर्यत तुडकी आहे तर विद्यार्थी संख्या २१० आहे शिक्षकांचे मंजुर ९ पदे पैकी शालेय कामकाज शिक्षण विभागा कडे विविध कामसाठी मिटींग साठी ये जा करावा लागत असल्याने ४ शिक्षकांना १ ते ८ पर्यत विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे द्यावे लागत असतांना संबंधीत शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नियोजन करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे वर्ग ५ ते ७ पर्यतच्या विद्यार्थी शिक्षक विना असल्याने शिक्षका अभावी विद्यार्थ्याचे शैक्षाणिक नुकसान होत असल्याने शिक्षण विभागाने कवठळ येथील उर्दु शाळेतील शिक्षकाची रिक्त पदे भरावी अन्यथा विद्यार्थ्याना शाळेत न पाठवता शाळेला कुलुप ठोको आंदोलन छेडण्याचा ईशारा गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद अली, उपाध्यक्ष शेख निसार , सदस्य शेख मजहर , शेख जमीर , शेख शाहरुख , शेख सद्दाम , यांनी दिला यावेळी वंचीतचे जेष्ठ नेते आ तु वसुलकर, अँड तौसिफ बेग , वंचीत युवा आघाडी तालुकाध्यक्ष आशिष धुदळे तालुका महासचिव शेख मजहर संदेश वाकोडे सह ग्रामस्थांनी आंदोलना पाठींबा दिला आहे शिक्षण विभागच्या संबधीत शाळेतील रिक्त पदे भरण्याकडे कवठळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak