राजकीय

कवठळ येथे पडले राष्ट्रावादी श प. पक्षाला भगदाड; सरपंच व सरचिटणीसांचा भाजपात प्रवेश

चिखली : चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले यांच्या अभूतपूर्व विकासकार्याचा प्रभाव ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या संख्येने अन्य पक्षातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी भाजपात प्रवेश करत आहेत. याच मालिकेत दि. १४ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील कवठळ येथील ग्रामपंचायतचे सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका सरचिटणीस यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाला मोठे भगदाड पडले असून याचा परिणाम २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर निश्चितपणे होणार आहे.

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चिखली मतदारसंघाचा कायापालट करणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कवठळ येथील सरपंच श्रीराम गावंडे व राष्ट्रवादी काँग्रेस श. प पक्षाचे तालुका सरचिटणीस रामदास पडघान यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन कऱ्हाडे, उपसरपंच अरुण कऱ्हाडे, दुर्गादास गावंडे, विशाल कऱ्हाडे, ज्ञानेश्वर राऊत, प्रमोद आराख, लक्ष्मण काकडे, कचरूबा कऱ्हाडे, नितीन गावंडे, नामदेव राऊत, कान्होबा कऱ्हाडे, समाधान गावंडे, वाल्मिकी कऱ्हाडे आणि सिद्धार्थ सावळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करत श्वेताताईंना खंबीर साथ देण्याचा निर्धार पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी गोपीनाथ लहाने, रोहित खेडेकर, सुधीर पडघान, गजानन परिहार, गणेश वाघमारे, शिवराज पाटील, निखिल पडघान, पंजाबराव गावंडे, पंजाबराव कऱ्हाडे आणि शिवशंकर गावंडे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close

error: welcome to vidarbhadastak