काँग्रेसचे दिवंगत नेते खलीक बाप्पू देशमुख यांच्या घरी माजी खा.मुकुलजी वासनिक यांची सांत्वन पर भेट

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस माजी खा.मुकुलजी वासनिक साहेब यांनी आज बुलढाणा दौऱ्यावर असतांना आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत आपले जुने सहकारी जेष्ठ काँग्रेस नेते स्व. खलीक बाप्पू देशमुख यांच्या परिवाराला सांत्वन पर भेट दिली. यावेळी संपूर्ण काँग्रेस परीवार उपस्थित होता.
भेटीदरम्यान देशमुख कुटुंबाची आस्थेने विचारपुस करुन धिर दिला व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आज जरी बाप्पू नसले तरी संपूर्ण काँग्रेस परिवार आपल्या सोबत आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी आशिषजी दुआ, नानाभाऊ गावंडे , कृष्णरावजी इंगळे , संजय राठोड , राहुल बोन्द्रे , जळगाव विधान सभा कॉग्रेस पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर , चिखली नगर परिषद माजी उपाध्यक्ष अल्प संख्यांक नेते दादू सेठ , जिल्हा कॉग्रेस कमेटी माजी अध्यक्ष ज्योतीताई ढोकणे, तेजेंद्रसिंग चव्हाण , सामाजीक कार्यकर्त्या परवीन देशमुख , कॉग्रेस जेष्ठ नेते अंबादास बाठे , जळगाव जा कॉग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर सह कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते देशमुख कुटुंब उपस्थित होते