घटनामहाराष्ट्र

काथरगाव येथे कठडे नसलेल्या पुला वरुन बैल कोसळुन गंभीर जखमी पशुपालकांचे ६० हजार रूपायाचे नुकसान सार्वजनिक बाधकाम विभागाच याला जबाबदार 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथे गुरांच्या बाजारात काकोळा येथील शेतकरी राजु कौलकर बैल बंडडी ४ सहकारी शेतकऱ्या सह  काथरगावचा पुल वरुन जात असतांना बैल खाली पांडव नदि पात्रात कोसळल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली बैल बंडडीत बसलेले शेतकरी बचावल्याने अनर्थ टळला कठडे बसविले असते तर अपघात झाला नसता व शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान  झाले नसते  या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप काथरगाव पिंप्री सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांनी केला पावसाळा संपल्या नंतर पुलाला कठडे लावणे अनिवार्य आहे परंतु गेल्या १२ महिण्या पासुन ग्रा पं कडून सुवर्णा टापरे यांनी संबंधीत विभागा कडे पत्र व्यवहार दुरध्वनी व्दारे संपर्क साधुन विना कठडे पुल असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर पुलावर कठडे बसविण्याची मांगणी कडे सार्वजनिक विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकरीचा बैल पुला वरुन पांडव नदि पात्रात कोसळून गंभीर जखमी झाल्याने संबधीत शेतकऱ्याचे ६० हजार रुपायाचे नुकसानाला सा बा विभागा जबाबदार असल्याचा आरोपही सरपंच टापरे यांनी केला
काथरगाव येथे गेल्या वर्षी जुन महिण्यात महापुरामुळे काथरगाव पांडव नदिवर पुलावरिल कठडेचे नुकसान झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरिल कठडे काढून नेले होते परंतु १२ महिण्या पासुन या पुलावर कठडे बसविण्यासाठी वेळच मिळत नसल्याची काथरगाव ग्रामस्थ कडून ओरड होत आहे आता तरि सदर पुलावरिल कठडे बसवुन देण्यात यावे व पशुपालक शेतकरी याला बैलाचे नुकसान भरपाई सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावी अशी मांगणी सरपंच सुवर्णा टापरे यांनी केली आहे यावेळी रयतक्रांती जिल्हाध्यक्ष नाना पाटील , मनोहर कंकाल , मयुर गोयल , संजय नांदोकार , उमेश टापरे , बाबुलाल बावस्कार , मनोहर पाखरे , विष्णु गोल्हर , आदी ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेऊन शेतकरीला सहकार्य केले सात्वन करित धीर दिला

तात्काळ कठडे बसवा व संबंधीत शेतकऱ्यांना बैलांचे नुकसान द्या अन्यथा तिव्र आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस सचिव गणेश टापरे यांचा ईशारा

गेल्या वर्षी पावसाळा संपवुन काथरगाव येथील पुलावर कठडे बसविण्यात न आल्याने शेतकऱ्याचा बैल घसरून झालेल्या अपघातात पुलावरुन बैल पडून मोठे आर्थिक नुकसान झाले यात ४ शेतकरी होते ते बालबाल बचावले जिवित हानी झाली नाही मात्र कठडे बसविले असते तर अपघात झाला नसता पुलाला कठडे न बसविणे याला सा वि जबाबदार असुन त्यामुळे संबंधीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस सचिव गणेश टापरे यांनी दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak