केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या हस्ते प्रथमेश जावकरचा सत्कार
बुलडाणा:येथील खेळाडू प्रथमेश समाधान जावकर याने चीनमधील होंगझ्यू येथे पार पडलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या प्रकारात सुवर्ण पदक मिळाविल्याबद्दल आज केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला आहे.
आमदार संजय गायकवाड, आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, माजी आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, विजयराज शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
चीनमधील होंगझ्यू येथे 19 आशियाई क्रीडा स्पर्धा 1 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडली. त्यामध्ये त्याने सर्वोकृष्ट कामगिरी बजावत सुवर्णपदकावर देशाचे नाव कोरले. प्रथमेश हा क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे त्याच्या वडिलांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला. जिल्हा नियोजनमधून त्याला 5.50 लाख रुपयांचे क्रीडा साहित्य देण्यात आले आहे.