महाराष्ट्रराजकीय
कॉग्रेस पक्षाच्या १३८ वर्धापन दिना निमित्त नागपुर येथे महारॅली मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभाग महासचिव हाजी मुज़म्मिल अली खान यांचे आव्हान

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] कॉग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य कांग्रेस कमेटी द्वारा आयोजित “है तयार हम” हे ब्रीदवाक्य घेऊन देशातील व राज्यातील अनेक ज्वलंत प्रशनांना वाचा फोडण्याकरिता कांग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महारॅलीचे आयोजन नागपुर येथे दि २८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या रॅली निमित्त संपूर्ण देशभरातून कमित कमी ८ ते १० लाख लोक जमा होण्याची शक्यता असुन, सदर रॅलीची जय्यत तयारी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे, सदर रॅली यशस्वी करण्याची जबाबदारी विदर्भावर जास्त प्रमाणात आहे, सदर रॅलीस संबोधीत करण्याकरिता अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मलिकार्जुन खर्गे, खा. श्रीमती सोनिया गांधी, खा. राहुल जी गांधी, श्रीमती प्रियंका गांधी, खा. मुकुल वासनिक, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, प्रदेश प्रभारी, मा. रमेश चैन्नीथाला, खा. इमरान प्रतापगडी, माजी खा. हुसेन दलवाई, प्रदेश अध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा,नाना गावंडे निरिक्षक बुलढाणा जिल्हा, राहुल बोंद्रे जिल्हा अध्यक्ष,आमदार राजेश एकडे,बद्रूज़मा निरिक्षक मलकापूर विधानसभा,आरिफ नसिम खान माजी मंत्री, अनिस अहमद माजी मंत्री, बाबा सिद्दिकी माजी मंत्री, एम. एम. शेख माजी आमदार, अज़हर हुसेन माजी मंत्री, माजी आमदार खतीब मार्गदर्शन करणार आहे, सदर रॅलीस देशातील व राज्यातील आजी माजी आमदार खासदार, नेते व मंत्री उपस्थित राहणार आहे, सदर महारॅली करिता जिल्ह्यातील व राज्यातील सर्व कांग्रेस अल्पसंख्याक विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी २८ डिसेंबर रोजी १:३० वाजता नागपूर येथे महारॅली प्रसंगी उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य कांग्रेस अल्पसंख्याक विभागाचे महासचिव हाजी मुज़म्मिल अली खान यांनी केले आहे.