कोद्री ग्रामस्थ ५ महिण्या पासुन दांडी बहाद्दर ग्रामसेवकाच्या प्रतिक्षेत ग्रामसेवक कळवा अन्यथा पं स मधुन गाव वगळा सामाजीक कार्यकर्ते अंकुश कड यांची मांगणी

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील शेवटच्या सिमेवर असलेल्या कोद्री ग्रा पं चे ग्रामसेवक आशिष जाधव १५ ऑगस्टला कोद्री ग्रा पं ला आले होते परंतु गेल्या ५ महिण्या पासुन ग्रा पं ला आले नसल्याने ग्रा पं चा काम ढेपाळला ग्रा पं संबंधीत दाखले मिळत नाही तसेच वृध्पकाळ श्रावणबाळ , संजय गांधी निराधार , विधवा प्रकरणासाठी ग्रामसेवक यांची सही असणे अनिवार्य असल्याने तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत गरजु लाभार्थीना घरकुल प्रस्ताव वरिष्ठांना ग्रा पं मार्फत न पाठविल्याने घरकुल उदिष्ट पुर्ती झाली नसल्याने घरकुल टारगेट मिळणार कुठून व प्रधान मंत्री घरकुलचा लाभ लाभार्थीना मिळणे दुर्मिळ झाल्याने दांडी बहाद्दर ग्रामसेवक गेल्या ५ महिण्या पासुन ग्रा पं कार्यालयात आलाच नसल्याने ग्रा पं संबधीत कामे रखडली ग्रामसेवक कळवा किवा संग्रामपुर पं समिती मधुन कोद्री गाव वगळा अशी अफलातुन मांगणी कोद्री येथील सामाजीक कार्यकर्ते अंकुश कड यांनी विस्तार अधिकारी सोनोने यांच्याकडे एक निवेदनाव्दारे केली आहे
गेल्या ५ महिण्या पासुन कोद्री ग्रा पं चा कारभार ग्रामसेवक अभावी ढेपाळल्याने ग्रा पं ला नागरिक चकरा मारुन हैरान झाले आहेत दांडी बहाद्दर मनमानीचा कळस गाठणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याशी गैरवर्तणुक करणाऱ्या वादग्रस्त ग्रामसेवक आशिष जाधव यास कुणाचा अभय असा प्रश्न उपस्थित करित संबंधीत ग्रामसेवक शासकिय नियम वरिष्ठ अधिकारीच्या आदेशाला केराची टोपली दाखवित कर्तव्यात कसुर करित मात्र दरमाह शासकीय पगार घेणाऱ्या ग्रामसेवकाची कार्यालयीन चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मांगणी सामाजीक कार्यकर्ते अंकुश कड यांनी विस्तार अधिकारी सोनोने यांच्या कडे केली आहे यावेळी जेष्ठ नागरिक माजी सरपंच श्रीराम खोंड, उध्वराव बा ठाकरे शिवसेना किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे सह कोद्री ग्रामस्थ उपस्थित होते