कोद्री ग्रा पं चे सरपंच नरेश खोंड यांचा भाजपात प्रवेश
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील कोद्री येथील कॉग्रेसचे सरपंच नरेश खोंड पाटील यांनी कॉग्रेस पक्षाला छोड चिटटी देऊन भाजपा पक्षात प्रवेश केला जळगाव जा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आमदार डॉ संजय कुटे यांनी पक्ष कार्यालयात सरपंच नरेश खोंड यांचे भाजप पक्षात स्वागत करताना कोद्री च्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते सभापती गजानन दाणे , बंडुभाऊ खोंड पाटील, तालुका अध्यक्ष लोकेश राठी, कोद्रीचे बुथ प्रमुख गजानन घटाळे, आवारचे सरपंच अभिजीत अवचार,युवा नेते पराग घोराड, नारायण अवचार ,अमोल अवचार भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्राम विकासासाठी भाजपात प्रवेश
नरेश खोंड सरपंच कोद्री
गेल्या काहि दिवसा पासुन कॉग्रेस पक्षा कडून स्थानिक ग्रा पं ला निधी उपलब्ध करुन दिली जात नव्हती त्यामुळे ग्रा प स्थरावर विकास थांबला होता काम होत नसल्याची ओरड होत होती जनतेचे कामे सह ग्राम विकास व्हावा यासाठी आ डॉ संजयजी कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन ग्राम विकासाच्या स्वप्नपुर्ती भाजपात प्रवेश केला