संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील कोलद वडगाव वाण दरम्यान वाण नदि पात्रात अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी ईसम कुंजलेल्या व गाढलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली
याबाबत थोडक्यात पोलीस सुत्रानी माहिती असे कि कोलद वडगाव वाण वान नदि पात्रात रेती उत्खलन करणाऱ्या मजुरांना दुर्गन वास येत होता मजुरांनी परिसरात पाहणी केल्यावर एक ईसम दफन केलेले त्याचे पाय दिसल्याने मजुरांनी नदि पात्रातुन निघुन गेले सदर घटनेची माहिती कोलद वडगाव वाण परिसरात वाऱ्या सारखी पसरली त्यामुळे नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली तर तामगाव पोलीसांना या बाबत माहिती होताच तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार दुय्यम ठाणेदार बोपटे , बीट जमादार वावगे सह पोलीस कर्मचारि घटना स्थळी दाखल झाल्यावर ठाणेदार पवार यांनी सुत्रे हालवित तहसिल कार्यालयाला माहिती दिल्या वरुन नायब तहसिलदार विजय चव्हाण ,ग्रामीण रूग्णालयचे वैधकिय अधिकारी डॉ विशाल दांडगे व ओरंसी पथक बुलढाणा यांना पाचारण करण्यात आले ओरंसी पथक आल्या कुंजलेले प्रेत बाहेर काढून तामगाव पोलीसांनी बारकाईने निरिक्षण केले असता मृतक ईसमा जवळ कोणतेही ओळख पत्र मिळून आले नाही मात्र अंगात पांढरे शर्ट व काळी पॅन्ट घातलेल्या ईसमाच्या शर्ट वर दानापुर टेलर्स असे पंचनामा दरम्यान निर्देशनास आले डॉ दांडगे व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रेतचे नमुने काढून ओरंसी पथकाला चाचणी तपासणी कामी देण्यात आले व प्रेत काटेल शिवारात दफन करण्यात आले त्यांच्या अहवाला नंतर प्रेताचा उलगडा होईल पोलीस दानापुर परिसरातील व्यक्ती हरविली आहे का याची चौकशी करित आहे तामगाव पोलीसांनी आकास्मित नोंद केली असुन तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पीएसआय बोपटे , बीट जमादार वावगे करित आहे
👉घातपाताचा संश्य चर्चेला उधान👈
संग्रामपुर तालुक्यात पाऊसात लहरी पणा असल्याने गावात पाऊस शेतात नाही पिकांना पोषक असा पाऊस आज पर्यत झाला दमदार पाऊस झाला नाही झाल्याने नद्या नाले कोरडेच आहे वान नदिला पुर आला असता तर अनोळखी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहू आला असेल मात्र वाननदी कोरडी असल्याने सदर ईसमाचा पातपात तर नव्हे ना अशी चर्चा होत आहे कानुन के हाथ लंबे होते है पोलीस तपास सुरु आहे ओरंसी लॅब चाचणी अहवाल प्राप्त झाल्या नंतर त्या दिशेने तपास होणार पोलीस तपासात सत्याची उकल होणारच आहे सदर घटनेने एकच खळबळ उडाली असुन समाजमन सुन्न झाले एवढे मात्र खरे