विशेष बातमी

खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे २५ व्या पुण्यतिथी निमित्त दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रम जम्मा जागरण व किर्तनाचे आयोजन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] रजत नगरी खामगाव तालुक्यातील पारखेड येथे राजयोगी परमहस संत अवलीया परशराम बाबा व रामदेव बाबा यांचे भव्य मंदिर असुन राजयोगी परमहंस संत अवलिया श्री परशराम बाबा यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे भव्य जम्मा जागरण व किर्तन चे आयोजन जळगाव जा व संग्रामपुर तालुका श्री रामदेव बाबा दर्शन समिती रामदेव बाबा , परशराम बाबा संस्थान पारखेड फाटा यांच्या संयुक्त विदमाने दोन दिवस धार्मिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला परिसरातील श्री परशराम बाबा व रामदेव बाबा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने प्रसिद्ध पत्रका द्वारे करण्यात आले आहे दि २७ डिसेंबर रोजी सकाळी श्री परशराम बाबा व श्री रामदेव बाबा यांच्या मुर्तीला दुध अभिषेक व पुजा आरती कलकत्ता येथील शंकरलाल अनुप टिबडेवाल यांच्या परिवाराच्या हस्ते होणार आहे दुपारी ४ वाजता रामदेव बाबा यांच्या जिवन चरित्रावर आधारित नागपुरचे प्रसिद्ध जाम्मा गायक उज्वल खकोलीया यांच्या मधुर वाणीतुन भव्य जाम्मा जागरण , अखंड ज्योत होणार आहे करण्यात आले तर रात्री ८ ते ९ वाजे दरम्यान महाप्रसादचे वितरण करण्यात येणार आहे दि २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हभप दत्तात्र्य महाराज शिंगाडे लोणी गुरव यांचे किर्तन होणार आहे दुपारी १२ ते ४ वाजे दरम्यान महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार परशराम बाबा व रामदेव बाबा मंदिर प्रांगणात श्री परशराम बाबा पुण्यतिथी निमित्त जम्मा जागरण व किर्तन संपन्न होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील परशराम बाबा व रामदेव बाबा यांच्या वर श्रद्धा ठेवणाऱ्या भावीक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान श्री रामदेवबाबा दर्शन सेवा समिती जळगाव जा व संग्रामपूर तालुका तसेच श्री रामदेव बाबा व परशराम बाबा संस्थान पारखेड फाटा शंकरलाल टिबडेवाल व टिबडेवाल परिवार कडून प्रसिद्ध पत्रका द्वारे करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak