खामगाव येथे आज महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
बुलडाणा : महाविकास आघडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिल रविवार रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक यांची हे जे. बी. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता जाहिर सभा होणार आहे. गेल्या काही लोकसभा निवडणूकांपूर्वी उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्या सभेनंतर राजकीय वातावरणात मोठा बदल झाल्याचे मागील उदाहरणे बघता विजयी सभा म्हणूनच बघितले जात असल्याचे सांगण्यात येते. पक्षाच्या फुटीनंतर उध्दव ठाकरे यांची ही पहिली निवडणूक आहे.
शरद पवारांची सुध्दा फुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचें लक्ष लागून राहिले आहे. तर या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे वतीने करण्यात आले आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गेल्या ७ दिवसा पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी महाविकास आघाडीचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, गणेश राजपुत, नरेश शेळके, चंदाताई बढे, सुनील घाटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत बुलडाणा मतदार संघ पिंजून काढला आहे.
मोताळा तालुक्यातील प्रचारा दरम्यान गावागावतील नागरिकांनी केलेले स्वागत, माता भगिनी यांनी केलेले औक्षण यावरूनच उद्धव ठाकरे यांच्या प्रती असलेले जनतेचे प्रेम दिसून येते. यावेळी बुलडाणा लोकसभेत बदल हा निश्चित आहे. जनतेने मनात आपला उमेदवार हा ठरविलेला असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तरी खामगाव येथे २१ एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.