राजकीय

खोटे आमीष देऊन सत्तेत असलेल्या दगाबाज नाकर्ते शासन कर्त्याना येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा प्रा नरेन्द्र खेडेकर

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] केंन्द्र व राज्यात खोटारडे आश्वासनाची खैरात वाटणारे खोटे आमीष देऊन सत्तेत आलेल्या शासन कर्त्याच्या कार्य काळात शेतकरी सर्व सामान्याची फसवणु झाली शेत मालाले भाव नाही जिवनाश्यक वस्तुचे भाव गगणाले भिडले मध्यवर्गीय गरिब सर्वाना सांसरीक गाळा हाकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे याच्या कारर्किर्दीत सुखी समाधनी कोणीच नाही या सरकारला विकास काय असतो माहितीच नाही खोटे आश्वासन आमीष देणाऱ्याना येणाऱ्या निवडणुकीत त्यांना हिसका दाखवा असे प्रतिपादन बुलडाणा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा नरेन्द्र खेडेकर यांनी पातुर्डा खुर्द येथील सितामाता मंदिर सभागृहात शिवसेना (उ बा ठा ) च्या वतीने आयोजीत बुथ कार्यकर्ता आढावा बैठकी प्रसंगी केले या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जि प्रमुख वसंतराव भोजने , जि सं प्र दत्ता पाटील , जि उप प्रमुख तुकाराम काळपांडे , विधान सभा संपर्क प्रमुख भिमराव पाटील, तालुका प्रमुख रविन्द्र झाडोकार , उप ता प्र कैलास कडाळे , युवा सेना जि उप प्रमुख अमोल मोदे , विजय मारोडे ,किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे , रामदास मोहे जनार्दन कुऱ्हाळे , भैय्या पाटील , प्रशांत इंगळे , गोपाल चोपडे , सह आदि पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दत्ता पाटील , तुकाराम काळपांडे , भिमराव पाटील यांनी केंन्द्र व राज्य सरकार वर ताशेरे ओढत ईडी सीबीआयचे धाक दाखवुन क्षणभर सुखा साठी गद्दारी करित सत्तेत आले गद्दाराना जनमन नाही उद्धव बाळा साहेब ठाकरे शिवसेना स्वाभीमानी पक्ष आहे पक्ष संघटन मजबुत करण्याचे आव्हान केले यावेळी अद्वैत झाडोकार , विक्रम झाडोकार , असलम पठाण यांनी उद्धव बा. ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला प्रवेश कर्त्याचे प्रा नरेन्द्र खेडेकर , दत्ता पाटील तर गोपाल झाडोकार यांना युवा सेना तालुका प्रमुख पदी नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले व पक्षाची छाटी हार घालुन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मधुन शिवसेना ता प्र रविन्द्र झाडोकार यांनी गाव निहाय बुथ प्रमुखाची पक्ष संघटन मजबुत व भविष्यात व येणाऱ्या काळात शिवसैनिकानी काय केले पाहिजे या विषयावर विस्तृत माहिती दिली संचालन राहुल मेटांगे यांनी केले तर कैलास कडाळे यांनी आभार मानले कार्यक्रमाला भैय्या पाटील , प्रशांत इंगळे , गोपाल चोपडे , नरेन्द्र झाडोकार , गोपाल झाडोकार , डिगांबर चोपडे , शंकर मुयांडे , जितेन्द्र देशमुख , मनिष पालीवाल , विलास मानकर , वासुदेव बोबंटकार , निलेश झाडोकार , सह तालुक्यातील बुथ प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak