गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप समीर दोडे, कार्तिक चोपडे यांचा शाहू मल्टिस्टेटकडून सन्मान

बुलढाणा : आपापल्या क्षेत्रात यशाचा झेंडा फडकवणाऱ्या समीर दोडे आणि कार्तिक चोपडे या जिल्हयातील दोन गुणवंतांच्या कामगिरीचे कौतुक करीत राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी त्यांचा गौरव केला.मोताळा तालुक्यातील तालखेड येथील शेतकऱ्याचा मुलगा समीर दोडे याने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप रनिंग स्पर्धेत देशातून प्रथम क्रमांक पटकावला. समीर हा दाताळा येथे नववीत शिकतो. त्याला रनिंगची आवड आहे. ग्रामीण भागातून असे खेळाडू समोर येणे गरजेचे आहे.मलकापूर येथील जनता महाविद्यालयाचा एनसीसीचा विद्यार्थी कार्तिक चोपडे याने बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स एचएमआय दार्जिलिंग येथे यशस्वीरीत्या पूर्ण करून एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकावला. या कोर्ससाठी देश विदेशातील गिर्यारोहक सहभागी झाले होते. कार्तिक चोपडे हा कोर्स पूर्ण करणारा महाराष्ट्रातील एकमेव एनसीसी कॅडेट आहे.दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने जिल्ह्याची मान उंचावली आहे. वन बुलढाणा मिशन आणि राजर्षी शाहू परिवारास याचा अभिमान असल्याचे सांगत मालतीताई शेळके यांनी दोघांचा सन्मान केला.