Blog

जस्तगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी भानुदास गौलखडे अविरोध

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील जस्तगाव सरपंचा सौ विद्या सुमित डोसे यांच्या अध्यक्षतेखाली जस्तगाव येथील मराठी पुर्व माध्यमीक शाळा शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी पालक वर्गाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जस्तगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी भानुदास गौलखडे यांची जस्तगाव कळमखेड दोन्ही गावातील समस्त पालक वर्गाच्या समन्वयातुन अविरोध निवड करण्यात आली
यावेळी नवनिर्वाचीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भानुदास गौलखेडे यांचा जस्तगाव ग्रा पं च्या लोकनियुक्त सरपंचा सौ विद्या सुमित डोसे यांनी कौतुक केले तर जस्तगावचे सामाजीक कार्यकर्ते सुमित डोसे मुख्यध्यापक गजानन सोळंके , शिक्षक कैलास राठोड, संतोष डोसे, कैलास वसतकार , विद्याभुषण वानखडे , यांनी गुल पुष्प देऊन सत्कार केला
यावेळी सतिष डोसे , प्रकाश डोसे ,सुनिल डांगे, मंगेश दहि , चक्रधर गवांदे ,विनोद वानखडे कलमखेड येथील शिवदास पाटील निलेश पाटील सह पालक वर्ग शिक्षक वृंद उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak