महाराष्ट्र
जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

वाशिम :- आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे,सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वजीरे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, अधीक्षक राहूल वानखेडे यांच्यासह ईतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.