डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच भारताला तारतील
चित्रपट निर्माते सुनिल शेळके यांचे प्रतिसादन
तथागत गौतम बुद्धांनी दिलेले स्वातंत्र्य समता बंधुतेचे विचार संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशाला दिले. हेच विचार येणाऱ्या काळात देशाला तारतील असे प्रतिपादन शिरपूर येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनिल शेळके यांनी केले आहे.
सुनिल शेळके बोलताना पुढे म्हणाले देशातील राजकीय लोकशाहीचे परिवर्तन सामाजिक लोकशाहीत झाले तरच बाबासाहेबांना अभिप्रेत असा भारत घडवता येईल. सत्यशोधक सारखा यशस्वी चित्रपट दिल्यानंतर सुनिल शेळके 6 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतीच महापरिनिर्वाण टीमच्यावतीने “जय भीम” या मराठी गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांना संगीतमय मानवंदना देण्यात आली आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव जयश्रीताई शेळके, सरपंच लक्ष्मीबाई सुसर, उपसरपंच सुवर्णाताई हिवाळे, पो.पा.अनिताताई गवई, मा.सरपंच भगवान शेळके, मा.सरपंच विजय शेळके, सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गवई, सुनिल गवई, जितू हिवाळे, पुजाताई हिवाळे, संदेश गवई, भगवान हिवाळे, संता महाराज, बबन शेळके, भारत शेळके, साहेबराव शेळके, गणेश शेळके, पंजाबराव निकाळजे, आशिष सावंत यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रपाल हिवाळे यांनी केले.