महाराष्ट्रविशेष बातमी
तहसिलदार टोंम्पे यांच्या पुढाकाराने त्या मृतक कोतवाल अस्वार कुटुंबियांसाठी आर्थिक मदत
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील एकलारा बानोदा येथील रहिवासी तर पळसोळा येथे कोतवाल पदावर मानधान तत्वावर कार्यरत मृतक लक्ष्मण अस्वार हे १६ एप्रिलच्या सायंकाळी गुप्त माहिती वरुन दोन तलाठी सह वाण नदीमध्ये विनापरवाना रेती वाहतूक करणारे वाहन पकडण्यासाठी गेलेले कोतवाल लक्ष्मण अस्वार यांनी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टर चालक संतोष पारिसे यास हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र कारवाईच्या भितीने ट्रक्टर चालक पारिसेन कोतवाल अस्वार यांचे पायावरून ट्रॅक्टर नेला त्यामुळे कोतवाल लक्ष्मण अस्वार गंभीर जखमी झाल्याने तहसीलदार योगेश टोम्पे यांनी तातडीने उपचारासाठी अकोला रवाना केले मात्र उपचारादरम्यान कोतवाल अस्वार यांचा मृत्यू झाला. अस्वार यांचेवर दुखाचे डोंगर कोसळले व घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर आले कोतवाल यांना शासना करवी शासकीय लाभ देण्याची तरतुद नसल्याने तहसीलदार योगेश टोम्पे यांनी अस्वार कुटुंबासाठी आर्थिक मदत करता यावी म्हणुन सोशल मिडीया व प्रत्येक्ष स्वता जातीने दुरध्वनीव्दारे संपर्क साधुन महसुल विभागाचे अधिकारी कर्मचारी कोतवाल संघटनेला आर्थिक मदत करण्याचे आव्हान केल्या वरुन तहसिलदार टोम्पे यांच्या आव्हाना प्रतिसाद देत संपुर्ण महाराष्ट्रातील महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मृतक कोतवाल अस्वार कुटुंबीयांना सरळ हाताने मदत केली जमा झालेली ५,७०,२०० रुपये आर्थिक मदत तहसिलदार टोम्पे यांनी यापुर्वी अस्वार कुटुंबांना सुर्पुत केली तर दि २४ एप्रिल रोजी संग्रामपुर तहसिल कार्यालयातील कार्यालयीन स्टाफ व मंडळ अधिकारी , तलाठी यांनी मृतक कोतवाल यांची पत्नी अस्वार कुटुंबांना ६१००० हजार रुपाया धनादेश तहसिलदार टोम्पे यांनी सुपुर्त केला यावेळी मंडळ अधिकारी चामलाटे, तलाठी जाधव, तलाठी शेख , सह महसुल कर्मचारी उपस्थित होते