महाराष्ट्रविशेष बातमी
तामगांव पोलीस स्टेशन हददीत लग्न, वरात व इतर मिरवणुकीत विनापरवाना डि.जे. वाजविल्यास होणार कार्यवाही – ठाणेदार राजेंद्र पवार
बुलढाणा [ जिल्हा प्रतिनिधी ] सध्या लग्नसराईची धामधुम सुरु असुन लग्न व वरात मिरवणुकीदरम्यान सर्रासपणे विनापरवाना डि.जे. वाजविल्या जात आहेत. तसेच लग्न व वरात मिरवणुक काढत असतांना संवेदनशिल ठिकाणी विनाकारण थांबुन मोठ्या आवाजात डि.जे. या वादयावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्या जात आहेत. त्यामुळे दोन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. पोलीस स्टेशन तामगांव हददीतील ग्राम पातुर्डा येथे सुध्दा दि. २०/०४/२०२४ रोजी लग्न मिरवणुकीदरम्यान मस्जीदीसमोर डि.जे. वर आक्षेपार्ह गाणे वाजविण्याचे कारणावरुन दोन गटांमध्ये वाद होवुन दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच काल दि. २७/०४/२०२४ रोजी रात्रीदरम्यान पोलीस स्टेशन सोनाळा हददीतील ग्राम टुनकी येथे झालेल्या वरात मिरवणुकीदरम्यान संवेदनशिल ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजविल्याने दोन गटात वाद होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. डि.जे. या वादयाच्या आवाजामुळे नवजात शिशु तसेच वयोवृध्द लोकांचे कानावर व हृदयावर वाईट परिणाम पडत आहेत. पोलीस स्टेशन तामगांव हददीतील गावामध्ये ज्या ठिकाणी लग्न समारंभ आहेत, त्याठिकाणी लग्न व वरात मिरवणुक काढल्या जात आहेत किंवा कसे? तसेच मिरवणुकीमध्ये डि.जे. वादय वाजवित आहेत काय? यावर तामगांव पोलीसांनी आपली गोपनीय यंत्रणा सक्रिय करुन त्यावर लक्ष ठेवुन आहेत. यापुढे पोलीस स्टेशन तामगांव हददीतील कुठल्याही गावामध्ये लग्न, वरात व इतर मिरवणुकीदरम्यान डि.जे. हे वादय पोलीसांची पुर्वपरवानगी न घेता त्याचेवर आक्षेपार्ह गाणे वाजवुन दोन धर्मामध्ये वाद होवुन कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास डि.जे. वादय पोलीस स्टेशनला आणुन त्याचेवर कायदेशीर व दंडात्मक अशी कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच लग्न व वरात मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाबाबत एकमेकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील, लग्न , वरात व इतर मिरवणुकी दरम्यान विना परवानगी तसेच आक्षेपार्ह गाणे वाजवुन नये दोन धर्मामध्ये वाद कायदा सुव्यवस्था निर्माण करु नये असे आवाहन तामगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र पवार यांनी प्रसिध्द पत्रकाव्दारे नागरिकांना केले आहे