तामगाव पोलीसांनी २ तासात चोरांच्या मुसक्या आवळल्या
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गग वानखेड येथील ६० वर्षीय वृध्द महिलेच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी गॅस सिलेन्डर शेगडी , फायबर खुर्च्या , टेबल फॅन , नविन कपडे सह बॅग लंपास केल्याची घटना दि २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान उघडकीस आली
या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील वानखेड येथील ६० वर्षीय वृद्ध महिला जमनाबाई व्दारकादास चांडक या महिलेच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन सदर महिलेच्या घरात घरफोडी करुन घरातील संसार उपयोगी साहित्य गॅस सिलेन्डर शेगडी किंमत अठ्ठाविशे रुपये, सिन्नी कंपनीचा टेबल फॅन किंमत एक हजार रुपये, नविन कपडे सह बॅग तिनशे रुपये असा एकुण ५ हजार शंभर रुपये चोरून नेल्याची घटना घडली तामगाव पोलीसांना समजताच सुत्रे हालवुन २ तासातच दोन संशयीतां कडून मुद्देमाल हस्तगत करून मुसक्या आवळल्या सदर घटनेची लेखी तक्रार जमनाबाई व्दारकादास चांडक यांनी तामगाव पोस्टेला दिल्यावरून वानखेड येथील आरोपी गजानन सुरेश सांळके व अशोक गजानन तायडे या दोघा विरुद्ध कलम ४५७, ३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केले जि पोलीस अधिक्षक कडासणे , अप्पर पोलीस अधिक्षक थोरात , पो उपविभागीय अधिकारी गवळी तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ दयाराम कुसुंबे, माळी , पोहेका गजानन गव्हांदे , पो का भागवत पवार, नळेकर खुफीया विभागाचे मनिष वानखडे, ड्रायव्हर सेवानंद हिवराळे , होमगार्ड चर्मचारी अरविंद उमाळे यांनी कारवाई केली