महाराष्ट्रविशेष बातमी

तेलंगी समाजाच्यावतीने धर्मवीर आ. संजय गायकवाड यांचा सत्कार

बुलडाणा :- शहरातील राजे संभाजी नगर स्थित श्री दत्त मंदीर येथे तेलंगी समाजाच्या समाज मंदिरासाठी 50 लक्ष रुपयाचा भरिव निधी मंजूर करुन दिल्याबद्दल धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांचा तेलंगी समाज बांधवांच्या वतीने जनसंपर्क कार्यलय मातोश्री येथे सत्कार करण्यात आला.(दि.21) जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्त शहरातील राजे संभाजीनगर परिसरातील दत्त मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलतांना समाजमंदिरासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले होते. त्यानंतर धर्मवीर आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन तेलंगी समाजाच्या समाज श्री दत्त मंदिरासाठी 50 लक्ष रुपयाचा भरीव निधी उपलब्ध करून देत आपल्या आश्वासनाची वचनपूर्ती केली. त्याबद्दल बुलडाणा शहरातील समस्त तेलंगी समाज बांधवांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क कार्यलय मातोश्री येथे बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. धर्मवीर संजय गायकवाड यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्याता आला. यावेळी महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्यासह तेलंगी समाजाचे चंद्रीभुषण मुंगे, चंद्रकांत चिटवार, मोहन येरले, व्यंकटस्वामी अय्यर, सुरेश ग्यारल, रुपेश रेड्डी, बबन गादे, कैलास इटावा, नरेंद्र येमले, नितीन दासर, आनंद चाफले, सुनिल गद्दलकर, मुकेश रेड्डी, श्याम मिसालकर, संजय मिसालकर, संजय येरले, संजय मिसालकर, सारंग कुंदेटकर, शेखर केशपागे, जगदीश पसपुलकर, जयंत स्वामी, राजेश निलगीरी, संजय पडगेल, राजेश कंतीकर, विनोद मुंगे, अमीत पुलेकर, रवी चिटवार, सुशिल गद्दलकर, नितीन गाडपकर यासह बुलडाणा शहरातील तेलंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak