घटना

तेल्हाऱ्यातील ४२ वर्षीय ईसमाचे प्रेत रिंगणवाडी शिवारात आढळले 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील रिंगणवाडी शिवारातील पांडे यांच्या शेतात अनोळखी ईसमाचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली होती सदर घटनेची माहिती तामगाव पोलीसांना समजताच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आव्हान करण्यात आले होते सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनोळखी व्यक्ती ओळख पटली असुन तामगाव पोलीसांनी दुरध्वनी व्दारे मृतक व्यक्तीचे नातेवाईकशी संपर्क साधल्यावर ते घटना स्थळी पोहचल्या नंतर पाहणी केली असता सदर मृतक ईसम तेल्हारा येथील ईदिरा नगर येथील रहिवासी सचिन विनायकराव पेटारे वय अंदाजे ४२ वर्ष असल्याचे निष्पन्न झाले या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तेल्हारा येथील सचिन विनायकराव पेटारे अंदाजे ४२ वर्ष ईसम मंतीमंद असल्याने दि २६ मे पासुन वरवट बकाल परिसरात भटकत होता दि २६ मे रविवार रोजी पायाला जखम असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी आल्याची व रेफर केल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे तसेच भटकत रिंगणवाडी शिवारात एका झाडाखाली झोपलेला होता मतीमंद स्वरुपाचा त्यात आजारी असल्याने सावली गेल्या नंतर उन्ह अंगावर घेतल्याने उष्णघात तर झाले नाही श्वविच्छेदन अहवाल आल्या नंतर नेकमे कश्याने मुत्यू झाला ते स्पष्ट होणार आहे तामगाव पोलीस घटना स्थळी दाखल झाल्या नंतर प्रेताचा पंचनामा केल्यावर श्वविच्छेदना साठी ग्रामीण रूग्णालय वरवट बकाल येथे हलविले श्वविच्छेदन झाल्या नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले तामगाव पोलीसांनी मर्ग दाखल केला तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास बीट जमादार मुळे करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak