दादा साहेब बाहेकर उर्दु हायस्कुलच्या विद्यार्थ्या कडून हर घर तिरंगा घर घर तिरंगा जनजागृती रॅली
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील दि आझाद एज्युकेशन सोसायटी व्दारा संचालीत दादा साहेब बाहेकर उर्दु हायस्कुलच्या वतीने शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यानी गावातुन हर घर तिरंगा घर घर तिरंगा बाबत गावातुन जन जागृती रॅली काढून नागरिकांनी आप आपल्या घरा वर सन्माने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट तिन दिवस तिरंगा झेंडा लावण्याचा संदेश दिला रॅली दरम्यान नागरिकांना भेटून घर निहाय आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय झेंडा तिरंगा घरावर सन्मान पुर्वक लावण्याचे आव्हान दादा साहेब बाहेकर उर्दु हायस्कुल शाळेचे मुख्यध्यापक कलीम खान यांनी केले
हर घर तिरंगा घर घर तिरंगा जनजागृती रॅली दरम्यान शाळेचे शिक्षक मो यासिन , शेख कय्युम , शेख नसिम , मो आसिफ उर रहेमान , लिपीक अमीर शाह , ईकबाल जावेद, ईरफानोद्दीन काझी, शेख तुकडू व सर्व विद्यार्थीनी विद्यार्थी सहभागी होते