महाराष्ट्रविशेष बातमी
देशी बनावट पिस्टल विक्रीच्या तयारीत असलेल्या मध्यप्रदेशातील चार आरोपींना निमखेडी फाट्या जवळ अटक होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुक पाश्वभुमिवर सोनाळा पोलीसांची मोठी कारवाई
संग्रामपुर [प्रतिनिधी ] लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील टुनकी वसाळी रोडवर निमखेडी फाट्या जवळ देशी बनावट पिस्टल विक्री करतांना सोनाळा पोलीसांनी मध्यप्रदेशातील ४ आरोपी कडून देशी अग्निशस्त्र पिस्टल मॅगझीन सह १७ नग जिवंत काडतुस ३ नग मोबाईल व दुचाकी सह ३२ हजार तिनशे सत्तर रुपये असा एकुण २ लाख १७ हजार ३७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ४ आरोपीना अटक केले सोनाळा पोलिसांनी दि १८ एप्रिल रोजी रात्री ५ : ३० वाजता मोठी कारवाई केली
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील निमखेडी फाट्या जवळ काही व्यक्ती पिस्टलची देवाण घेवाण करणार असल्याची गोपनीय माहिती सोनाळा पोलिसांना मिळाल्या वरुन सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील समय सुचकता दाखवुन सुत्र हलविले वसाळी व हडियामाल या ठिकाणी सापडा रचून यातील टुकनी वसाळी रोडवर निमखेडी फाट्यावजवळ भारसिंग मिसऱ्या खिराडेव रा. पाचोरी ता. खकणार जि. बुऱ्हाणपूर मध्य प्रदेश हिरचंद गुमानसिंह उचवारे रा. पाचोरी ता खकणार जि. बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश आकाश मुरलीधर मेश्राम रा. करूणानगर बालाघाट मध्य प्रदेश, संदीप अनंतराम डोंगरे रा. आमगाव ता. बालाघाट या ४ आरोपीना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ देशी बनावटी ४ नग (अग्निशस्त्र) पिस्टल मॅगझीनसह किंमत प्रत्येकी ३० हजार रुपये प्रमाणे १ लाख २० हजार रुपये, १७ नग जिवंत काडतूस किंमत ८ हजार ५०० रुपये, तीन मोबाईल फोन किंमत १६ हजार ५००, एक मोटार सायकल किंमत ४० हजार रुपये, नगदी रोख ३२ हजार ३७० रुपये असा एकूण २ लाख १७ हजार ३७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोनाळा पोलीस स्टेशन येथे अग्निशस्त्र कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पो अधिक्षक अशोक थोरात , अप्पर पोलीस अधिक्षक बी.बी महामुनी , उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. गवळी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सदर कारवाई सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या पथकातील पोहेको, विनोद शिंबरे, विशाल गवई, सैय्यद मोहिनोद्दीन , पोकों, राहूल पवार, गणेश मोरखडे, चालक शेख ईमरान , पोहेको, विनायक इंगळे यांनी केली
बॉक्स
सोनाळा पोलीसां कडून पिस्टल घेणाऱ्यांचा शोध सुरु
लोकसभा निवडणुक च्या पाश्वभुमिवर मध्यप्रदेशातुन येऊन सोनाळा पोस्टे अंतर्गत वसाळी शिवारातील टुनकी वसाळी रोडवर निमखेडी फाट्या जवळ देशी बनावट पिस्टल खरेदी विक्रीची माहिती सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ सुत्र हालवुन सापडा रचुन निमखेडी फाट्या वर ४ आरोपीना मुद्देमाला सह अटक केली मात्र सदर घटनेमधील पिस्टल घेणाऱ्या व्यक्ती कोण हे याचा शोध घेण्या साठी सोनाळा पोस्टेचे ठाणेदार पाटील यांनी विशेष पथक तयार केले पिस्टल घेणाऱ्यासाठी शोध मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती सोनाळा पोलीसांनी दिली