धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण

बुलडाणा :-धनगर समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्ो नंदू जगन्नाथ लवंगे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी समाज बांधवांच्या भावना वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. धनगर समाज बांधव : मोठ्या संख्येने भूमिहीन व अल्प भूधारक असल्याने या समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थिती बिकट आहे. धनगर समाजाची राज्य सरकारमध्ये अनुसूचित जमातीमध्ये नोंदणी असूनही या समाजाला कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाहीत. या मागणीबाबत लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र आजपर्यंत या समाजाला त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. या मागणीबाबत 29 जानेवारीला निवेदनही देण्यात आले. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजाला आंदोलनाचा अधिकार न मिळाल्यास हा समाज मार्गस्थ होईल, असेही लवंगे यांनी निवेदनात्ूान सूचित केले आहे. 29 जानेवारीपासून त्ो उपोषण करत आहेत.