धारणी पोलिसांनी दिले आठ गाई व चार बैलांना जीवनदान १ लाख २८ हजार रुपायाचा मुद्देमाल जप्त अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल धारणी पोलीसांची कारवाई

बुलडाणा [ प्रतिनिधी ] अमरावती जिल्हा अंतर्गत धारणी येथील मुस्लिम कब्रस्तान च्या मागे असलेल्या नाल्यामध्ये झुळुपात अत्यंत निर्दयपणे गोवंश संश्यीत कत्तलीकरिता बांधून ठेवण्यात आले होते दि ७ एप्रिल रोजी सायंकाळी गोपनीय खबर मिळाली की मध्य प्रदेश येथील नाग उतार गावांमधून दहा पंधरा गोवंश हे कत्तलीचे उद्देशाने जंगलातून आणून हातपाय बांधून, चारा पाण्याची व्यवस्था न करता, निर्दयीपणे कत्तलिकरीता मुस्लिम कबरस्थान च्या मागे झाडाझुडपात बांधून ठेवलेली आहेत. अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंचांसह मुस्लिम कब्रस्तान च्या मागे असलेल्या झाडाझुडपांमध्ये पाहणी करून कारवाई केली असता 12 गोवंश जनावरे यामध्ये आठ गाई व चार बैल अत्यंत क्रूरपणे निर्दयतेने हातपाय बांधून, चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता बांधलेले दिसून आले. त्यांच्या मालकीबाबत आजूबाजूला विचारणा केली असता कोणीही मालक हजर आले नाही. वरून 12 गोवंश पंचासमक्ष ताब्यात घेऊन एकूण 128000/- रू चा मुद्देमाल जप्त करून जनावरे चाकरदा येथील गोरक्षण मध्ये जमा करण्यात आले तसेच धारणी पोस्टेला अज्ञात आरोपी विरूध्द कलम 5, 5बी,9,11 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 सहकलंम 11(3) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने धारणी पोस्टेचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे, अनंत हंकारे.पोलीस अंमलदार मोहित आकाशे, जगत तेलगोटे चालक पोलीस उपनिरीक्षक साबुलाल दहीकर, सय्यद जावेद यांनी सदरची कारवाई केली