नांदुरा येथे सिरत कमेटीच्या वतीने २९ मे रोजी मुस्लिम सामुहिक विवाह चे आयोजन

बुलढाणा [ प्रतिनिधी ] जिल्ह्यातील नांदुरा परिसरातील मुस्लिम समाजातील गोर गरिब शेवटचा घटकांची पाल्य आर्थिक पाठबळ अभावी आपल्या मुला मुलीची ईच्छा असतांना लग्न करु शकत नाही सिरत कमेटी पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतुन सामाजीक कार्य मदती चा एक पाऊल पुढे करित सिरत कमेटी नांदुरा च्या वतीने दि २९ मे २०२४ बुधवार रोजी सामुहिक विवाह चे आयोजन करण्यात आले आहे तरी समाजातील लोकांनी या शुभ कार्यात सहभागी होऊन आयोजकांना सहकार्य करावे व आपले मुला, मुलिंचे लग्न या सामुहिक विवाह सोहळ्यात पार पाडावे, लग्नाच्या नोंदी साठी सिरत कमेटी च्या सदस्यांना भेटुन आपल्या घरातील किंवा नातेवाईकांच्या होणाऱ्या विवाहची नोंद करावी कष्टाचे घाम गाळून कमविलेल्या पैसाचा लग्न कार्यावर वायफळ खर्च न करता निशुल्क सामुहिक विवाहात आपल्या मुला मुलीचे लग्न करावे सदर सामुहिक विवाह निशुल्क असुन वधु व वर असे दोन्ही कडिल २०० पाहुने मंडळी जोडप्यांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याची मुभा सामुहिक विवाह सोहळा सिरत कमेटी आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली सामुहिक विवाह सोहळ्या दरम्यान संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात येईल म्हणून मुस्लिम समाजातील लोकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सिरत कमेटी च्या वतीने करण्यात आले आहे.विवाह नोंदणी साठी या सदस्यांशी संपर्क साधावा.
हाजी मुज़म्मिल अली खान,९३५९७७७९२४,९४२३७६१०३१, मौलाना साबिर, इरफान खान ९८५०७०६८४०, मो. मुबीन, कलीमउल्लाह खान, हुसैन खान, अनवर पहेलवान,मो.नईम, अज़मत खान,शेख लतीफ,बशीर खान,नईम खान, निसार अत्तारी, नज़िर रज़वी, शेख मुस्तफा, एनुलहक मक्तेदार, शेख अयाज़,शेख अवैस, सोहिल खान, ज़ुबैर खान, मज़हर खान, शेख मोईन, अमिन रज़ा, जावेद अहमद, दानिश मिर्झा, दानिश अदनान, वसिम तबरेज़, शेख अमिन, अब्दुल कादिर, आसिफ खान, शेख आसिफ.