विशेष बातमी
पातुडर्यात गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड रोटरी क्लब अकोलाच्या वतीने अपंग लाभार्थीना व्हिलचेअर वितरण

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील श्री बालाजी मंदिर संस्था सभागृहात गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड रोटरी क्लब अकोलाच्या वतीने अपंग गरजु लाभार्थीना व्हिल चेअर वितरण करण्यात आले पातुर्डा येथील श्री बालाजी मंदिर सभागृहात छोटे खानी कार्यक्रमात पातुर्डा परिसरातील देवेन्द्र उमेश सुरळकार , नेतल संजय चांडक , पळसोळा येथील भिकाजी सैरीसे , गायत्री नगर येथील अजय देविदास आमझरे यांना अध्यक्ष मोहित भाला ,सचिव वैजयन कोरकने ,सुनिल साधवानी , समाज सेवक तथा उद्योजक रमण चतर्भुज राठी, ओंकार गांगळे यांच्या हस्ते अपंग गरजु लाभार्थीना व्हिल चेअर सायकल वितरण करण्यात आले यावेळी राजकुमारजी व्यास ,दुर्गादास चांडक , ग्रंथपाल अनंत सातव, मदन तापडिया , कृषि केंन्द्र संचालक कमलकिशोर राठी ,संजय चांडक, उमेश सुरडकार , सरस्वती वाचनालय कर्मचारी गजानन राजनकार , बाबुलाल शर्मा व अपंग लाभार्थीचे नातेवाईक सह माहेश्वरी समाज बांधव पातुर्डा ग्रामस्थळ उपस्थित होते