संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली श्री बालाजी संस्थान मंदिरात प्रदिप राठी यांच्या हस्ते समाज बांधवांच्या उपस्थितीत भगवान महेश यांचा अभिषेक करण्यात आले नंतर गावातुन वाजत गाजत भगवान महेश यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली श्री बालाजी मंदिर संस्थान येथे शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला व माहेश्वरी समाज बांधवांना महाप्रसाद वितरण करण्यात आल्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव व महिला मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते