विशेष बातमी
पातुडर्यात श्री महासिध्द महाराज यात्रा महोत्सव निमित्त ५० वर्षापुर्वी श्री महासिध्द महाराज भक्तांनी प्रारंभ केलेला ५० किलोला भंडारा आता झाला ११ किंन्टलचा पंचकोशितील हजारो भक्तांनी घेतला महाप्रसाद

संग्रामपूर [ प्रतिनिधी] तालुक्यातील संत महात्मांची नगरि म्हणुन सर्व दुर पर्यत ओळख असलेल्या पातुर्डा नगरित श्री महासिध्द महाराज यात्रेला ग्रामस्थांच्या सहकार्याने ४५ वर्षा पुर्वी शेषराव दळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवात केली होती लोकवर्गीणुत गोळा झालेले धान्य ५० किलो ज्वारी व दाळीचे वरण छोटा भंडारा यात्रे निमित्त प्रसाद वाटप केले जात होते कालानंतराने दरवर्षी वाढ होत आहे ५० वर्षापुर्वी महासिध्द महाराज भक्तांनी प्रारंभ केले ५० किलोला भंडारा आता झाला ११ किंन्टलचा येथे १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान दि २५ फेब्रुवारी रोजी हभप विनायक भोपळे
महाराज यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान संपन्न झाले त्यानंतर तयार करण्यात आलेल्या ११ क्विंटल गहुच्या पोळ्या व अडीच क्विंटल दाळीच्या वरणाचा प्रसादाचे हजारो भाविकांना आज २५ फेब्रुवारी रोजी वितरण करण्यात आले. श्री महासिध्द महाराजांच्या जयजयकाराने मंदिर व भंडाऱ्याचे परिसर दणाणून गेला होता. पातुर्डा ४५ ते ५० वर्षांपूर्वी दळवी कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ५० किलो ज्वारीचा भंडाऱ्याला सुरुवात केली होती. श्री राधाकृष्ण संस्थान माळी पंचचे विश्वस्व व गावातील बहुजन समाज बांधव सामाजीक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने दरवर्षी त्यामध्ये वाढ होऊन आज हा भंडारा ११ क्विंटल पर्यंत पोहचला असून आज ज्वारी च्या भाकरी ऐवजी गव्हाच्या पोळ्या व मिश्र दाळीचे चवदार वरण हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ह्या महासिध्द महाराजाच्या प्रसाद प्रत्येकांने घ्यावा अशी भाविकांची श्रद्धा आहे भंडाऱ्यातील प्रसाद घेण्यासाठी
पातुर्डा पंचकोशितील अबाल , वृध्द, युवक सह महिला वर्ग आर्वजुन हजेरी लावतात व श्री महासिध्द महाराज मंदिरात नतमस्तक होतात भंडाऱ्यासाठी पातुर्डा ग्रामस्थ स्वयस्फुर्तीने धान्य व पैसे सह सर्वपरिणे सहकार्य करतात हे मात्र विशेष

