विशेष बातमी

पातुडर्यात श्री रामनवमी जन्मोत्सव निमित्त संगित सदुष्य श्रीमद रामायण ज्ञानयज्ञ सप्ताह ९ एप्रिल पासुन प्रारंभ ! १७ एप्रिलला सांगता

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथे श्री रामनवमी जन्मोत्सव निमित्त संगित सदुष्य श्रीमद रामायण ज्ञानयज्ञ सप्ताहचे दि ९ एप्रिल ते १७ एप्रिल आयोजन रामायण कथा समिती पातुर्डा ग्रामस्थांच्या वतीने अयोध्या धाम माळी पंच मठ येथे करण्यात आले असुन श्रीमद रामायण ज्ञानयज्ञ सप्ताह कथा प्रवक्ता महंत स्वामी सुरेश्वरनंजी गिरी ( दासगिरी महाराज अंबोडा ) यांच्या मुदु वाणीतुन श्रीराम कथा प्रवचन सायंकाळी ७ ते १० पर्यत होणार आहे तर हभप नंदकिशोर महाराज ढेगे मातोडी यांचे श्री रामनवमी जनमोत्सव निमित्त दि १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता किर्तन होणार आहे दुपारी ४ वाजता अयोध्या धाम येथुन नगरप्रदक्षिणा श्रीराम यांची झाकी सह गावातुन मिरवणुक काढण्यात येणार आहे दि १७ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान महाप्रसाद वितरण केल्या नंतर श्रीमद रामायण ज्ञानयज्ञ सप्ताहची सांगता होणार पातुर्डा परिसरातील भक्तांनी रामनवमी जन्मोत्सव निमित्त श्रीमद रामायण ज्ञानयज्ञ सप्ताहचा लाभ घ्यावा असे आव्हाण रामायण कथा समिती व पातुर्डा ग्रामस्थांच्या वतीने एका प्रसिध्द पत्रकाव्दारे केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *