विशेष बातमी

पातुर्डा गावातील शाळा सरंक्षण भिंती विना !  शाळेय साहित्य , रेकार्ड , विद्यार्थी सुरक्षा ऐरणीवर पालक वर्ग जिल्हयाचे पालकत्व यांच्या बैठकीच्या प्रतिक्षेत

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सर्वात मोठे गाव पातुर्डा असुन मुख्य मार्गाने २७८क्रमाकांचा राज्य मार्ग गेलेला आहे राज्यमहामार्ग कामा अंतर्गत गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी कंत्राटदार कंपनी करवी राज्यमहामार्ग लगत असलेल्या हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदेचे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय , जि प कन्या शाळा , जि प मराठी मुलांची शाळा एकत्र आहेत तर जि प उर्दु पुर्व माध्यमीक शाळा त्यामुळे गावातील व २३ खेडे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी ये जा करतात विद्यार्थी संख्या पाहता शाळा सुरु होण्यापुर्वी व सुटल्यानंतर या परिसरात यात्रेचे स्वरुप येते त्यात राज्यमहामार्ग रस्ता विकास अंतर्गत संबंधीत कंत्राटदार कंपनीने जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय व जि प उर्दु पु मा शाळेच्या सुस्थितीत असलेल्या सरंक्षण भिती जेसीबीने जमीन दोस्त करण्यात आल्या गेल्या २ वर्षापुर्वी सरंक्षण भिती पाडल्याने शाळेतील साहित्य महत्वाचे दस्तावेज रेकार्ड सह विद्यार्थ्याच्या जिवाला धोका असल्याने विद्यार्थ्याच्या व शाळा महाविद्यालयाची सुरक्षा ऐरणीवर आल्याने जि प च्या संबंधीत विभागाने याकडे देऊन शाळाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे अशी मांगणी शालेय शिक्षण समिती पालक वर्गान कडून होत आहे
जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षण भिंत व फाटक नसल्याने गावातील मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो जनावर शाळेच्या खोल्या समोर घाण करतात शाळाच्या इमारतींची सुरक्षा ऐरणीवर आली आहे प्रशासनाने या ठिकाणी सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी जिल्हाधिकारी सह शिक्षण विभागाकडे एका निवेदनाव्दारे संबंधीत शाळेच्या शालेय शिक्षण समितीचे विष्णु भोंगळ , संजय सुपडाजी वानखडे , शेख अजरोदीन सह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल, मराठी प्राथमिक शाळा, कन्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अंगणवाडी, उर्दू प्राथमिक व हायस्कूल या सर्वच शाळा महामार्गाच्या कडेला आहे राज्यमहामार्ग झाल्याने या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जातात. शाळा सुटली की चिमुकली मुले रस्त्याने घराकडे जाण्यासाठी धाव घेतात शाळे जवळ किळकोळ अपघात झालेत शाळांना सरंक्षण भिती अभावी भविष्यात अपघाताची होण्याची शक्यता नाकारता येत नाही

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सरंक्षण भिंत बांधकाम प्रलंबीत पालकमंत्रीच्या बैठकीची प्रतिक्षा !
दिर्घ काळा पासुन जिल्हा नियोजन समितीची बैठक न झाल्याने पातुर्डा येथील ग्रा पं ने रितसर ठराव घेऊन जि प महाविद्यालय मराठी उर्दु शाळाच्या सरंक्षण भिंती बांधकाम मंजुर करुन महाविद्यालय शाळा विद्यार्थी सुरक्षतेच्या दुष्टीकोणातुन त्वरित कामाला मंजुरात मिळविण्यासाठी ग्रा पं सरपंच रणजीत गंगतीरे व ग्रा पं सदस्य ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेंगे व शालेय समिती पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला मात्र परिस्थिती जैसे थे असुन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षते खाली बैठकीत सदर कामांना मंजुरी मिळेल पालक वर्ग शाळा पालकमंत्री च्या बैठकीची आतुरतेने वाट पाहत आहे ऐवढे मात्र खरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak