पातुर्डा ग्रामसेवा सह संस्था तथा दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह बँक मार्फत खरीप पिक कर्ज वाटपास प्रारंभ
पातुर्डा ग्रामसेवा सह संस्था तथा दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह बँक मार्फत खरीप पिक कर्ज वाटपास प्रारंभ
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा ग्राम सेवा सहकारी संस्था जिल्हा केंन्द्रीय सहकरी बॅक मार्फत ग्राम सेवा सहकारीचे सभासद शेतकऱ्यांना खरिप कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली संस्थेचे सभासद शेतकरी शेख बन्नु शेख रहेमान, व सुभाष बोपले यांना संस्थेचे अध्यक्ष शरदराव तायडे, उपाध्यक्ष प्रकाशराव देशमुख संचालक तथा भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी , सचिव संजय पांडे यांच्या हस्ते खरीप पिक कर्ज देऊन कर्ज वाटपाला सुरूवात करण्यात आली जिल्हा सहकारी
बँकेचे विकास अधिकारी जि. एस.ढगे व शाखाधिकारी चौधरी यांनी कर्ज वाटपाचे कामकाज केले.संस्थेचे एक वर्ष दोन वर्ष थकीत असलेल्या बहुताश शेतकरी सभासदांनी या वर्षी दुष्काळी परीस्थीती असुन सुध्दा त्यांचे कडील थकीत पिक कर्जाचा संपुर्ण कर्जभरणा केला आहे.व आपल्या संस्थेचा कर्जवसुलीचा अग्रक्रम कायम ठेवला आहे,आपणास पुन्हा कर्ज मिळेल ही आशा ठेवली आहे,तरी पून्हा पिक कर्ज मिळावे म्हणुन संस्था स्तरावर व बँक स्तरावर सुध्दा मागणी करीत आहेत.तरी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी, थकीत शेतकरींची वर्गाची कर्जाची गरज व मागणी पाहता कर्ज वाटप करावे अशी मागणी होत आहे.