महाराष्ट्र
पातुर्डा जिल्हा परिषद कन्या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वेशभुषा व भाषण स्पर्धा संपन्न

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा जि.प कन्या शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम मुख्यध्यापक एस आर मोरखडे सह उपस्थित शिक्षक शिक्षीका यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन हार अर्पण करुन अभिवादन केले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चरित्रा भाषण स्पर्धा मध्ये ३० विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला तर वेशभुषा स्पर्धेत ४० विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला होता यावेळी भाषण स्पर्धे मध्ये सहभागी विद्यार्थीनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या तत्कालीन काळात मुलीना शिक्षणाची मुभा नव्हती शिक्षणा साठी तारेवरची कसरत करित भारतीय समाजातील काहि घटकांचा विरोध पतकारुन छळले नानाविध समस्याचा सामना केला तरी शिक्षणासाठी केलेली जन जागृती केली त्यामुळे आजच्या आधुनिक युगातील मुलीना शिक्षणाचा अधिकार मिळाल्याने आजच्या मुली चुल व मुल पर्यत मर्यादीत न राहता मुली शिक्षण घेत असल्याने सर्वच क्षेत्रात आपल्या कला गुणांना वाव मिळत आहे सावित्रीबाई फुले यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला भाषण स्पर्धा व वेशभुषा स्पर्धाचे निकाल व बक्षिस प्रमाण पत्र वितरण २६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिनी करण्यात येईल यावेळी मुख्यध्यापक एस आर मोरखडे , शिक्षक एच व्ही मानकर , एन जी जमालपुरे, एस व्ही पवार , शिक्षिका एन सी निमकर्डे , पी एल डायलकर , एस एम ताळे , सह अनंता धर्माळ , शालेय समिती सदस्य , विद्यार्थिनी उपस्थित होत्या