पातुर्डा जि प केंद्रीय मराठी प्राथमिक मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक केशव अबगड यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ व सत्कार

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्याती पातुर्डा येथील जि प केंन्द्रीय मराठी प्राथमिक मुलांचे शाळेचे मुख्यध्यापक केशव संपतराव अबगड शिक्षण विभागातुन सेवानिवृत झाल्याने मुख्यध्यापक केशव अबगड यांना निरोप समारंभ सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा व्य समितीचे विष्णु भोंगळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे गौतमराव मारोडे , मिलिंद सोनोने, श्याम कौलकार, राम निमकर्डे हे होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक वसंत खंडारे यांनी केले. सेवापुर्ती निमित्त मुख्यध्यापक केशव अबगड यांचा सह पत्नीक सत्कार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पातुर्डा , तसेच प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी शंकर बगाडे निमकर्डे सर, महादेवराव राऊत सर, म की खंडेराव, अनिल वानखडे , मुख्यध्यापक जटाळे, जि प पुर्व कें उर्दु शाळाचे शिक्षक वृंद , शालेय पोषण आहार कर्मचारी तसेच पातुर्डा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच पातुर्डा संपूर्ण केंद्राच्या वतीने त्यांना छ शिवरायांचे प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. सत्कारमूर्ती विषयी उर्दु शाळेचे मुख्यध्यापक मो. मुस्ताक , निमकर्डे सर मुख्यध्यापक तरोळे केंद्रप्रमुख केंद्र पातुर्डा मिलिंद सोनोने, गौतमराव मारोडे, यांच्या सह त्यांच्या अर्धांगिनी यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना अबगड सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेश म्हसाळ यांनी केले तर येऊल सर यांनी आभार मानले कार्यक्रमाला गोपाल धर्माळ , सुरेश वानखडे , शिक्षक एच व्हि मानकर, अनिल धनभर, शकिल अहेमद ,पवन राठोड ,दिनेश तायडे सपना निमकर्डे , सोनाली वानखडे , रूपाली वानखडे,व नारायण वानखडे, महादेव कुरवाडे ,पुंडलिक निमकर्डे सह पातुर्डा पंचकोशितील शाळेचे मुख्यध्यापक ,शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक मिलिंद इंगळे , मिटकरी , शंकर वखारे ,कृष्णा देवगिरीकर अनंत धर्माळ गजानन मानकर , संजय वानखडे यांनी प्रयत्न केले