पातुर्डा बु येथील शाळेतील सरंक्षण भिंत खोल्या दुरुस्ती करुन शिक्षकांची रिक्त पदे भरा मुख्यकार्यकारी शिक्षण अधिकारी यांच्याशी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांची चर्चा
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दु शाळा राज्यमहामार्गा लगतच असल्याने सदर रुदिकरणामुळे दोन्ही शाळेच्या सरंक्षण भिंती कंत्राटदार कंपनीने करवी जमीन दोस्त करण्यात आल्याने दोन्ही शाळा सरंक्षण भिंती विना असल्याने शाळेतील दस्तवेज सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच गावातील मोकाट जनावरांचा शाळा परिसरात मुक्त संचार असल्याने घाण करतात शाळेच्या भिंती बांधकाम मंजुरात देण्यात यावी तसेच शाळा खोल्या दुरुस्ती सह शिक्षकांची रिक्त पदे भरुन विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान टाळावा अशी मांगणी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन केली आहे
संबंधीत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि पातुर्डा येथील जिल्हा परिषद मराठी कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत प्राथमिक मुलाची शाळा व मराठी मुलींची कन्या शाळा असुन तर जि प उ पु उर्दु माध्यमीक शाळा अश्या दोन्ही शाळेच्या सरंक्षण भिंती रस्ता रूदिकरणामुळे सरंक्षण भिंती जमीन दोस्त करण्यात आल्याने विद्यार्थी व शालेय महत्वाचे साहित्य सुरक्षा धोक्यात आली असुन संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन पातुर्डा येथील मराठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा हायस्कुल , या शाळेतील खोल्याची दुरुस्ती करणे गरजे असल्याने या कामाला मंजुरात देण्यात यावी तसेच पातुर्डा अंतर्गत देऊळगाव , नेकनामपुर येथील शाळेतील खोल्या दुरुस्ती कामाला मंजुरात देण्यात यावी शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शेतकरी शेत मजुर गरिब नागरिकांच्या पाल्यांचे शैक्षणीक नुकसान होत असल्याने शाळाच्या विद्यार्थीच्या सुरक्षतेच्या दुष्टीकोनातुन सरंक्षण भिंती शाळेतील खोल्या दुरुस्ती कामाला त्वरित मंजुरात देऊन विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मांगणी निवेदन देता वेळी चर्चा दरम्यान संबंधीत अधिकाऱ्यांशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी केली आहे