पातुर्डा येथील जिल्हा परिषद महाविद्यालय प्रांगणात राष्ट्रीय युवा सप्ताह दिना निमित्त आयोजीत विविध कार्यक्रमा अंतर्गत विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार सलग्नित नेहरू युवा केंद्र बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था तथा नवयुवक मंडळ , सरस्वती वाचनालय पातुर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला राष्ट्रीय युवा सप्ताह दिना निमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमधील व स्पर्धेमधील स्पर्धकांना प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधुन २६ जानेवारी रोजी जि प हायस्कूल पातुर्डा येथे मुंबई न्यायलयचे न्यायधीश सुजितकुमार तायडे , लोकनियुक्त सरपंच रणजीत रामदास गंगतीरे , उपसरपंच शोभाताई कृष्णराव राहाटे , प्राचार्य नरवाडे , स्वामी विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उत्तमराव तायडे , सचिव किशोर दसोरे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णु भोंगळ , सरस्वती वाचनालयचे ग्रंथपाल अनंत सातव ग्रा पं सदस्य निलेश चांडक, सिद्धार्थ गाडे आदि मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू स्वरूपात प्रदान करण्यात आल्या
यावेळी सरस्वती वाचनालयाचे विनायक चोपडे, पत्रकार श्याम इंगळे, रामेश्वर भड , गजानन राजनकर, निखिल देशमुख सह स्पर्धक उपस्थित होते प्रास्ताविक सपकाळ सर तर आभार प्रदर्शन अंबादास इंगळे यांनी केले